कार्तिक आर्यन-कियाराचा “भूलभुलैया 2′ पोस्टपॉंड

“भूल भुलैया 2′ हा अनीस बज्मीद्वारा दिग्दर्शित आणि भूषण कुमारद्वारा निर्मित चित्रपट आहे. हा चित्रपट 31 जुलै 2020ला प्रदर्शित होणार होता. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे हा चित्रपट लांबणीवर पडला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत कियारा आडवाणी आहे. त्याचबरोबर चित्रपटात तब्बूही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

या चित्रपटाचे निर्माते म्हणाले आहे की, सध्या कोणत्याही स्थितीत शुटिंग करणे शक्‍य नाही. तसेच लवकरच शुटींग सुरू करण्याचा कोणताही प्लॅन नाही. सध्या चित्रपटात काम करणारे सर्वजण सुरक्षित राहून योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या शुटिंगचा मोठा भाग लखनौमध्ये शुट होणार होता. मात्र आता तिथे शुटिंग करणे शक्‍य होणार नाही. याऐवजी दुसरीकडे शुटिंगसाठी जागा शोधली जाणार आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीचे एक हजार कोटीपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सध्या महाराष्ट्र सरकारने काही अटीशर्तींनुसार शुटिंग करायला परवानगी दिली आहे, मात्र अजूनही बॉलिवूडमध्ये कोणी रिक्‍स घ्यायला तयार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.