रायगड जिल्ह्यातून 13 हजार जणांचे स्थलांतर

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळे 18 तासात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग परिसरातील 13 हजार 245 जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. शाळा, मंगल कार्यालय, समाज मंदिरे प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यात या स्थलांतरीतांची सोय करण्यात आली आहे.

निसर्ग चक्रीवादळ हे अलिबागच्या समुद्रकिनारी येणार असल्याने प्रशासनाकडून वेगवान हालचाली करण्यात आल्या. एकट्या अलिबाग तालुक्‍यात एनडीआरएफच्या तीन तुकड्या आल्या असून त्यांनी समुद्र किनारी गावातील परिस्थितीची पाहणी केली आहे. 

अलिबाग तालुक्‍यातील 4 हजार 587, पेण 87, मुरुड 3 हजार 235, उरण 1 हजार 899, पनवेल 55, श्रीवर्धन, 3 हजार 343, म्हसळा 239 अशा 13 हजार 245 नागरिकांना जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्यावतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या नागरिकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.