Karthik Aryan: कार्तिक आर्यनने अल्पावधीतच सिने इंडस्ट्रीत मोठे यश संपादन केले आहे. चित्रपटांमध्ये विविध भूमिका त्याने साकारल्या आहेत. अभिनयाच्या जोरावर आणि हँडसम लुकमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर देखील तो सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच त्याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावरून त्याच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
कार्तिकने इनस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कार्तिक खूपच हँडसम दिसत आहे. हे फोटो शेअर करून कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले, “शादी ready!”. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. मात्र अद्याप याबाबत त्याने कोणतीही अधिकृतरित्या महिती दिलेली नाही. परंतु सध्या बॉलीवूडमधील अनेल सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. यातच यात कार्तिकचे देखील नाव जोडले जात आहे. मात्र कार्तिकच्या आगामी सिनेमांसह त्याच्या लग्नाची चाहत्यांना आता प्रतीक्षा लागली आहे.
View this post on Instagram
लव्हलाईफबद्दल बोलायचे झाल्यास, कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र कालांतराने त्यांचा ब्रेकअप झाला आणि ते वेगळे झाले. मात्र या जोडीचे चाहते आजही आहेत. पण आता दोघांमध्ये पॅचअप झाल्याचं म्हटलं जात आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कार्तिक आर्यन हा 2023 मध्ये प्रदर्शित कार्तिकचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट सुपरहिट झाला. याशिवाय गेल्या अनेक दिवसांपासून कार्तिक कबीर खान दिग्दर्शित ‘चंदू चॅम्पियन’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात कार्तिक भारतीय लष्करातील जवानाची भूमिका साकारताना दिसणार आहे.हा चित्रपट याच वर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कार्तिक आगामी हंसल मेहताच्या ‘कॅप्टन इंडिया’ आणि ‘भूल भुलैया 3’चाही समावेश आहे.