Karnataka Rajyasabha Election। कर्नाटकमधील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे सय्यद नसीर हुसेन यांच्या विजयानंतर सुरू झालेला वाद थांबण्याच नाव घेत नाही. काँग्रेसचा राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. काँग्रेसचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यातच भाजपचे (भाजप) आमदार दोड्डानगौडा पाटील आणि आमदार रविकुमार यांनीही विधान सौधा पोलीस ठाण्यात नसीर हुसेन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,”काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या उत्सवाचे अनेक व्हिडिओ रेकॉर्डिंग गोळा केले आहेत. तसेच या दाव्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ते व्हिडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवतील. नसीर हुसैन यांच्या विजयानंतर जल्लोषात त्यांच्या समर्थकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा आरोप भाजपने केलाय.
भाजप नेत्यांचा हल्लाबोल Karnataka Rajyasabha Election।
विरोधी पक्षनेते आणि भाजपचे सदस्य आर अशोक यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस सरकारला चांगलेच धारेवर धरले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करत, “तुकडे टोळी… राज्यसभेच्या तीन जागा जिंकून पुन्हा देशाचे विभाजन होऊ शकते असे तुम्हाला वाटले होते का?” असा सवाल केला आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हटले की, पक्षात देशविरोधी विष भरले आहे. भारताच्या लोकशाहीच्या मंदिरात पाकिस्तान झिंदाबादचा देशद्रोहाचा नारा घुमत आहे. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही या घटनेचा निषेध केलाय.
भाजपच्या आरोपांवर काँग्रेसचे स्पष्टीकरण Karnataka Rajyasabha Election।
भाजपने केलेला हा आरोप सत्ताधारी काँग्रेसने फेटाळून लावलाय. या प्रकरणी काँग्रेसने,”विजयानंतर नसीर हुसेन यांचे समर्थक “नसीर साहेब जिंदाबाद” च्या घोषणा देत होते. पाकिस्तान झिंदाबाद असा नारा कोणीही दिला नाही. असे स्पष्टीकरण दिलंय. निवडणुकीत विजयी झालेल्या नसीर हुसेन यांनीही अशा आरोपांचे खंडन केलंय. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. दुसरीकडे, या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये कामगार फक्त “नसीर साब जिंदाबाद” च्या घोषणा देताना दिसत आहेत.