बंगलुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आङे. त्यांच्या सरकारने दोन वर्षे कार्यकाळ पूर्ण केला त्याच दिवसी येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून एका ३५ वर्षीय समर्थकाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.
रवि उर्फ रचप्पा असे आत्महत्या करणाऱ्या समर्थकाचे नाव असून तो कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील बोम्मलपूर गावातील रहिवासी आहे. ही घटना समजताच येडियुरप्पा यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहनही केले.
कर्जबाजातातून सुद्धा ही आत्महत्या करण्यात आली असल्याचे बोबले जात आहे. मात्र पोलिसांना याविषयी कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे कर्जबाजारातून आत्महत्या झाली असावी हे स्पष्ट झाले नाही.
येडियुरप्पा यांनी ट्वीट करत आवाहन केले की, “प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही चढउतार येत असता. परंतु कोणालाही त्यासाठी आपला बहुमूल्य जीव गमावण्याची गरज नाही.”