बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आता ती लवकरच रोमांटिक कॉमेडी ‘चालबाज इन लंडन’मध्ये झळकणार आहे. यात श्रद्धा कपूर डबल रोल साकारणार आहे. या चित्रपटाला पंकज पराशर हे डायरेक्ट करणार आहेत, ज्यांनी श्रीदेवीचा ‘चालबाज’ हा चित्रपट केला होता.
एका मुलाखतीत पंकज पराशर यांनी श्रीदेवीच्या ‘चालबाज’ आणि श्रद्धा कपूरसोबत साकारण्यात येत असलेल्या ‘चालबाज’मधील फरक सांगितला. तसेच त्यांनी असाही खुलासा केला की, ‘चालबाज’ चित्रपटाच्या आगामी सीक्वलकडूनही खूप उपेक्षा आहेत.
पंकज पराशर म्हणाले, मी श्रीदेवीसोबत ‘चालबाज’ चित्रपट केला होता. तेव्हा आम्हाला असे वाटत होते की, त्यांनी काळाच्या पुढील चित्रपट साकारावा. या विचारांनीच मी ‘चालबाज इन लंडन’च्या तयारीत आहे. हा एकदम नवीन चित्रपट असणार आहे,
जो नव्या जगासोबत आणि त्याला साजेशा असा असेल. हा चित्रपट जुन्या ‘चालबाज’पेक्षा एकदम वेगळा असेल आणि त्याची कथाही आजच्या काळाला अनुसरून असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, श्रद्धा कपूरही या चित्रपटात काम करण्यासाठी खूप उत्साहित आहे. यात ती डबल रोल साकारत असल्याने तिलाही चित्रपटाकडून मोठया अपेक्षा आहेत.