मुंबई : मुंबईत बांधकाम सुरु असणारी चार मजली इमारत समोरच्या 3 घरांवर कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांना अग्निशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी 4 तासांत वाचवले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Maharashtra: A four-storey building collapsed in Andheri area of Mumbai last night. Five people sustained injuries in the incident and were admitted to a hospital. pic.twitter.com/cHu9euJOyH
— ANI (@ANI) July 28, 2021
मुंबईत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरी पश्चिममध्ये जुहू गल्ली परिसरात अमर सोसायटीमध्ये एका 1+3 असे 4 मजल्याच्या घराचे बांधकाम सुरु असताना ते समोरच्या 3 घरांवर कोसळले .
या घरांच्या ढिगाऱ्याखाली 5 जण अडकले होते. त्यांना मुंबई अग्निशमन दलाचा जवानाने घटनास्थळावर धाव घेऊन तीन ते चार तासांमध्ये रेस्क्यू केले. या 5 जखमींना जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.