करमाळा – भारतीय जनता पार्टी करमाळा यांच्या वतीने धर्मवीर संभाजीराजे यांची जयंती व भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी करमाळा. तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके, भाजयुमोचे प्रदेश सचिव दीपक चव्हाण, संजय घोरपडे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, सरपंच डॉ. अमोल घाडगे, अ.जा. मोर्चा चे अध्यक्ष वैजिनाथ भगत, नरेंद्रसिंह ठाकूर, नितीन झिंजाडे, रक्तपेढीचे कव्हेकर व पाटील आदी उपस्थित होते.
करमाळा शहरातील कॉटेज हॉस्पिटल समोरच्या श्री दत्त मंदिर येथे शनिवार दिनांक 14 मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन
करमाळा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी केले होते, त्या आवाहनास भरघोस असा प्रतिसाद देत १२३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी जि.प. सदस्या सवितादेवी राजेभोसले, डॉ श्रीराम परदेशी, भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण बोकण, सरचिटणीस महादेव फंड, यशकल्यानी संस्थेचे गणेश करे-पाटील, महेंद्र पाटील, सरपंच डॉ. अमोल दुरुनदे, डॉ. सारंगकर, आबा टापरे, नितीन आढाव, महेशराजे भोसले, शिवाजी पाटील, लखमीचंद हासिजा, पत्रकार आलीम शेख, भिसे सर, विशाल घोलप आदींसह करमाळा शहर व तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी यांनी रक्तदान शिबीरास सदिच्छा भेट दिली.
रक्तदान शिबिर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संतोष कांबळे, दयानंद बंडगर, गोपाल वाघमारे,गणेश क्षीरसागर, प्रेमसिंग परदेशी आदींसह मित्रपरिवार व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.