बॉलिवुडमधील सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली करिश्मा कपूरने बॉक्स ऑफिसवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सध्या ती आपल्या कुटुंबियांसमवेत इंजॉय करत आहे. तसेच ती सोशल मीडियावरही ऍक्टिव्ह असते आणि आपल्या चाहत्यांशी संवाद साधत फोटोज् आणि व्हिडिओ शेअर करत असते.
करिश्मा कपूरने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या एका जुन्या चित्रपटातील गाण्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्यासोबत सलमान खान डान्स करताना दिसत आहे. या पोस्टसह तिने कॅप्शन लिहित चाहत्यांना हा चित्रपट आणि गाणे कोणते आहे? असा सवाल केला आहे. यावर तिच्या चाहत्यांनी लाखोंच्या संख्येने कॉमेटस् दिल्या आहेत. तसेच अनेक जणांनी हा फोटो रि-पोस्ट करत लाईक्स् दिले आहेत.
करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ती “झिरो’ चित्रपटात एक पाहुणी कलाकार म्हणून झळकली होती. याशिवाय ती आता चित्रपटसृष्टीत जास्त सक्रिय नसते. दरम्यान, ती वेब सिरीजमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे.