करीना कपूर खान सध्या “डान्स इंडिया डान्स’ या रिऍलिटी शो ची जज बनली आहे. नवोदित नृत्य कलाकारांचे परीक्षण करत असतानाच तिचा एक मजेदार व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये करीना हातात कुदळ आणि फावडे घेऊन शेतामध्ये काम करताना दिसते आहे. तिला कुदळ आणि फावड्याचे वजनही पेलवत नव्हते. तरीही नेटाने ती माती उकरण्याचा खटाटोप करताना दिसते आहे.
करीनाचा हा व्हिडिओ तिने फॅनपेजवर शेअर केला आहे आणि या व्हिडिओमध्ये करीना कपूरचा अनोखा अंदाजही बघायला मिळतो आहे. स्वतः करीनाने या व्हिडीओबाबत काहीही खुलासा केलेला नाही. तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत काही सरप्राईज या व्हिडीओमधून तिला द्यायचे असणार हे नक्की आहे.
नक्की कोणत्या सिनेमासाठी तिला हे सगळे करायला लागले हे समजू शकलेले नाही. ते समजायला थोडा वेळ लागू शकतो. सध्या करीना आपल्या दोन सिनेमांचे शुटिंग संपवते आहे. अक्षय कुमारबरोबर “गुड न्यूज’ आणि इरफान खानब्रोबर “इंग्लिश मिडीयम’मध्ये ती दिसणार आहे. या पूर्वी “वीरे दी वेडिंग’हा करीनाचा अखेरचा सिनेमा होता.