मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने सिनेसृष्टी करियर जवळपास दोन दशकांन पहिले सुरु केले होत. करीना कपूर खानने तिच्या कारकिर्दीत अनेक पॉवरपॅक परफॉर्मन्स दिले आहेत. आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. करीना तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांच्या मनावर राज्य करते.
करिनाच्या हिट चित्रपटांची यादी 3 इडियट्सशिवाय अपूर्ण आहे. करिनाने या चित्रपटात झळकली होती. ANI वृत्तसंस्थेने करीना कपूर खानचे एकूण पाच फोटो शेअर केले आहेत. एका चित्रात करिनाने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे, तर दुस-या चित्रात करीना साडी नेसलेली सुंदर दिसत आहे.
तिसर्या चित्रात करीना एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीसारखी दिसत आहे, तर चौथ्या चित्रात करिनाचा बॉब कट आहे. यासोबतच, पाचव्या चित्रात करीनाने केशरी रंगाचा टी-शर्ट घातला आहे आणि तिने हेल्मेटही घातले आहे. या चित्रपटात करीनाही या लूकमध्ये दिसली होती, सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
3 इडियट्स हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात करीनासोबत आमिर खान, आर माधवन, शर्मन जोशी आणि बोमन इराणी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले होते आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. तुम्हाला आवडेल त्या कामाला तुम्ही तुमचा व्यवसाय बनवल्यास तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा मोठा संदेश या चित्रपटातून देण्यात आला. चित्रपटाचे कलेक्शनही चांगले होते.