Rakhi Gulzar – करण अर्जुनमध्ये शाहरुख खान आणि सलमान खानच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुम्हाला आठवत असेलच. होय, राखी गुलजार जिला लोक अजूनही करण अर्जुनची आई म्हणून आठवतात. राखी तिच्या चाहत्यांना एक मोठं गिफ्ट देणार आहे. बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर असलेली ही अभिनेत्री पुन्हा एकदा दमदार कमबॅक करण्याच्या मूडमध्ये आहे. राखी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.
राखी गुलजार बंगाली चित्रपटातून चित्रपटसृष्टीत कमबॅक करणार आहे. जवळपास एक दशकानंतर राखी बंगाली चित्रपटात दिसणार आहे. ती लवकरच अमर बॉस या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात राखीसोबत नंदिता रॉय आणि शिबोप्रसाद मुखर्जी देखील स्क्रिन शेअर करणार आहे. राखीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.
राखी शेवटची 2003 मध्ये रितुपर्णो घोषच्या बंगाली चित्रपट शुभो महुरात दिसली होती. यानंतर ती 2019 मध्ये गौतम हलदरच्या निर्बानमध्ये दिसली. आता ती पुन्हा बंगाली चित्रपटात एन्ट्री घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत. अमर बॉस या चित्रपटात ती काम करणार आहे, ज्याचे शूटिंग पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होणार आहे. शिबोप्रसाद मुखर्जी यांनी राखीसोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
राखी गुलजार बंगाली बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. 75 वर्षांपूर्वी 1967 मध्ये बंगाली चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.