Parineeta Chopra: बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्राने (Parineeta Chopra) काही दिवसांपूर्वी आप पक्षाचे नेते राघव चढ्ढासोबत यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. लग्नातील दोघांच्याही लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तेव्हापासून ती नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. नुकतेच लग्नानंतर परिणिती अक्षय कुमारसोबत ‘मिशन रानीगंज’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती इम्तियाज अलीच्या ‘चमकीला’ चित्रपटात दिसणार आहे.
विशेष म्हणजे परिणीतीने ‘चमकिला’साठी तब्बल 15 किलो वजन वाढवल्याचा खुलासा केला आहे. मात्र आता ती पुन्हा एकदा पूर्वीसारखी दिसण्यासाठी जिममध्ये व्यायाम करत आहे. सोशल मीडियावर जीममधील एक व्हिडिओ शेअर करत परिणीतीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गेल्या वर्षी मी रहमान सरांच्या स्टुडिओमध्ये 6 महिने गाण्यात घालवले आणि ‘चमकीला’साठी 15 किलो वजन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त जंकफूडखाण्यासाठी घरी परतलो. संगीत आणि अन्न असा माझा दिनक्रम होता. पण आता हा चित्रपट बनल्याने स्टोरी उलट झाली आहे.”
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले की, ‘मला स्टुडिओची आठवण येते आणि मी पुन्हा माझ्यासारखे दिसण्याचा प्रयत्न करण्यासाठी जिममध्ये कसरत करते. आणि अमरजोत जी सारखे नाही! अवघड झाले आहे. पण इम्तियाज सर तुमच्यासाठी काहीही! आणि हा रोल. अजून काही इंच कमी करायचे आहे.’
परिणीती चोप्रा ‘चमकिला’ चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे. दिलजीत अमर सिंग चमकिलाची भूमिका साकारणार आहे, तर परिणीती त्यांची पत्नी अमरजोत यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. लग्नाआधी अभिनेत्रीने दिलजीत दोसांझसोबत इम्तियाज अलीसच्या ‘चमकिला’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते.