मुंबई – अभिनेता आणि कथित समीक्षक केआरके अनेकदा त्याच्या ट्विटद्वारे मीडियाचे लक्ष वेधून घेतो. केआरके दररोज अभिनेते आणि बॉलिवूड चित्रपटांवर भाष्य करताना दिसतो. केआरके पुन्हा एकदा त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. यावेळी त्याने कॉमेडी किंग कपिल शर्माला लक्ष्य केले आहे. केआरकेने कपिल शर्माच्या शोला पनौती म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी ‘पठाण’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांची उदाहरणे देऊन आपले म्हणणे मांडले आहे.
केआरकेने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘शाहरुख खानने कपिल शर्माच्या शोमध्ये त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाचे प्रमोशन केले नाही आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. त्याचप्रमाणे कपिलच्या शोमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे प्रमोशनही झाले नव्हते आणि हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता. अशा स्थितीत कपिल शर्माचा शो चित्रपटांसाठी मोठी पनौती असल्याचा हा पुरावा आहे.
SRK didn’t promote #Pathaan on Kapil Sharma show and film is superhit. Film #Kashmirfiles was not promoted on Kapil Sharma show and film was superhit. So It’s proof that Kapil Sharma show is a Big Panauti for the films. Hope others also won’t promote their films on PANAUTI show.
— KRK (@kamaalrkhan) February 5, 2023
शाहरुख खानच्या ‘पठाण’ बद्दल बोलायचे झाले तर, 25 जानेवारीला रिलीज झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आता केआरकेने चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर पठाण चित्रपटाची सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. रिलीज झाल्यानंतर पठाणने दुसऱ्याच आठवड्यात वर्ल्ड वाईड आठशे कोटींचा गल्ला कमावला आहे.