मुंबई – कॉमेडी किंग कपिल शर्मा गिन्नी आणि १२ डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. २००७ साली कॉमेडी रिएलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिलने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने कित्येक शोजमध्ये काम केले.
View this post on Instagram
Jai mata di 🙏 #ashtami #kanjakpoojan #daddysgirl #anayra #daughter 😍 #3monthsold #gratitude 🙏 🧿
कपिल आणि गिन्नीचा या सेलिब्रिटी जोडीच्या जीवनात जानेवारीमध्ये एका चिमुकलीचं आगमन झालं आहे होत. अशातच कपिलने पुन्हा एकदा इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या फोटो शेअर केला आहे. ‘जय माता दी. अष्टमी, कंजक पूजन.” असं या फोटोला कॅप्शन दिले आहे.
दरम्यान, कॉमेडी सर्कस, झलक दिखला जा ६ व उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगली पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही आणि त्याने कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.