“83′ सिनेमाला कपिल देव यांचा होता विरोध

रणवीर सिंहचा आगामी “83’बाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाने सर्वप्रथम विश्‍वकरंडक जिंकल्याच्या कामगिरीवर आधारीत या सिनेमाला स्वतः कपिल देव यांचाच विरोध होता.

अलिकडेच नेहा धुपियाच्या टॉक शो मध्ये स्वतः कपिल देव यांनी माहिती दिली. असलेल्या या सिनेमात महान क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका रणवीर आणि पत्नी रोमीचा रोल दीपिका पदुकोण साकारते आहे, असे समजल्यावर त्यांना थोडी भीती वाटायला लागली होती.

रणवीर कलाकार आहे. तो क्रिकेट खेळू शकेल की नाही, अशी शंका कपिल देव यांना वाटली. मात्र शुटिंगच्या आगोदर रणवीरबरोबर प्रॅक्‍टिस सेशनमध्ये वेळ घालवल्यावर त्यांची ही भीती निघून गेली.

रणवीरने क्रिकेट खेळण्याची खूप प्रॅक्‍टिस केल्याचे त्यांना जाणवले. गेल्या वर्षी जून-जुलैमध्ये रणवीर दिवसाचे 8 तास प्रॅक्‍टिस करत असायचा. मात्र प्रॅक्‍टिस दरम्यान तो जखमी होण्याची भीतीच कपिल यांना वाटू लागली.

7-8 दिवस रणवीर कपिल देव यांच्या बरोबरच राहिला. कपिल यांची प्रत्येक हालचाल, लकबी, त्याने कॅमेऱ्यात शूट करून घेतली आणि त्याचा अभ्यासही केला. त्याचे हे कष्ट बघून आपली भीती निघून गेल्याचे कपिल यांनी सांगितले. “83′ पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.