नवी दिल्ली: बॉलिवूड गायिका कनिका कपूर’ला नुकतीच कोरोना व्हायरसची लागण झाली होती. कनिका कपूर लंडनहून परत आली, त्यानंतर ती पार्ट्यांमध्ये गेली. मात्र, नंतर कनिका कपूर जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले तेव्हा तिला लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात होते. सध्या कनिका कोरोना निगेटिव्ह असून तिच्या आई-वडिलांसोबत राहत आहे.
कनिका पार्टी दरम्यान अनेक नेत्यांना भेटली. कोरोना व्हायरसचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर कनिका यांच्यावर माहिती लपविण्याचा आणि हेतु परस्पर लोकांमध्ये विषाणूचा संसर्ग केल्याचा आरोप केला. मात्र, आता कनिका कपूर यांनी यावर आपले स्पष्टीकरण सादर केले आहे.
गायिका कनिका कपूरने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “मला माहिती आहे की बर्याच गोष्टी माझ्याभोवती फिरत आहेत. काही गोष्टी जाणीवपूर्वक पेटवून देण्यात आल्या. त्यावेळी मला शांत बसणे योग्य वाटत होते. मी यामुळे शांत नव्हते कि मी चुकीचे होते. लोकांना चुकीचा समज दिला गेला आणि चुकीची माहिती दिली गेली आहे. सत्य स्वतःहून समोर येईल, या वस्तुस्थितीला मी वेळ दिला.