पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत मदत म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. वाय.जी.ऊर्फ आबासाहेब शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दहा हजार दिले आहेत. त्यांनी ऑनलाईन ही रक्कम ट्रान्सफर केली. ऍड. शिंदे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे जिल्हा लीगल सेलचे अध्यक्ष आहेत. फुल नाही, तर फुलाची पाकळी म्हणून करोनाच्या इलाजासाठी ही रक्कम दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
न्यायालय चालू नसल्यामुळे सर्व वकील मंडळी हतबल झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही मदत महत्त्वपूर्ण आहे. ज्याला शक्य आहे. त्या नागरिकांनी या कठीण प्रसंगात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देण्याचे आवाहन ऍड. शिंदे यांनी केले आहे.