मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच सोशलचा वापर करत देशातील अनेक मुद्यावर ट्विट करीत असते. तिच्या ट्विटमुळे नेहमीच सोशल मीडियावर अनेक वाद निर्माण होतात. यामुळे ती नेहमीच चर्चत असते. ती ट्विटरच्या माध्यमांतून अनेकदा लोकांवर खोचक शब्दात टीका करीत असते. मात्र कंगनाने केलेल्या ट्विटमुळे ती पुन्हा अडचणीत सापडली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, ट्विटरने तिच्या अनेक ट्विटला वादग्रस्त ठरवत अनेक ट्विट डिलीट केले आहे. कंगना सुरुवातीपासून शेतकरी आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेत आहे. शेतकरी आंदोलनात पाठिंबा देणाऱ्या अनेक बॉलीवूड सेलेब्सबाबत तिने वादग्रस्त ट्विट केले आहे. यावेळी सुद्धा ती पुन्हा आक्रमक झाल्यामुळे ट्विटरने तिच्या ट्विटवर अकॉउंटवर कारवाई केली आहे.
We have taken action on Tweets that were in violation of the Twitter Rules in line with our range of enforcement options: Twitter Spokesperson on tweets of actor Kangana Ranaut that are showing “no longer available” on her handle. pic.twitter.com/7szMriq701
— ANI (@ANI) February 4, 2021
तत्पूर्वी, ट्विटरने आपल्या धोरणांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरने तात्पुरते निर्बंध आणल्यानंतर कंगनाने ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांच्यावरही निशाणा साधला होता. यापूर्वी तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे तिचे कोटींच्या घरात नुकसान झाले आहे. सहा दिग्गज ब्रँण्डने तिच्यासोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे.