Bollywood – अभिनेत्री कंगना राणावतने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कंगनाने सांगितले की,’चाहत्यांना लवकरच ‘तनु वेड्स मनू’चा तिसरा भाग पाहायला मिळणार आहे. तिने सांगितले की, ती आगामी काळात तीन प्रोजेक्टवर काम करणार आहे, त्यापैकी एक म्हणजे तनु वेड्स मनू 3. त्याचबरोबर साऊथ स्टार विजय सेतुपतीसोबत हा चित्रपट साइन करण्याबाबतही सांगितले आहे.
कंगनाला तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल विचारण्यात आले. ज्यावर ती म्हणाली,“मी विजय सेतुपती सरांसोबत एक थ्रिलर सुरू करत आहे. ती लवकरच विजय सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ‘नोटी बिनोदिनी’ नावाचा चित्रपट आणि ‘तनु वेड्स मनू 3’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीक येणार आहे. ‘तनु वेड्स मनू’च्या तिसऱ्या भागाबद्दल ऐकून आर माधवनचे चाहतेही खूप खूश होणार आहेत.
‘तनु वेड्स मनू’च्या तिसर्या भागाची घोषणा हे एक मोठे आश्चर्य आहे. कारण यापूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय यांनी चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी नकार दिला होता. 2015 च्या एका मुलाखतीत, तो म्हणाला, “मी तिसरा भाग बनवणार नाही कारण तो ब्रँड आहे किंवा तो काम करेल. याला मालिका मानू नका. सध्या, तिसरा भाग नाही. मला वाटतं किमान आत्ता तरी मी पात्रं पूर्ण केली आहेत.”
चित्रपटाच्या दिग्दर्शकाशिवाय मुख्य अभिनेता आर माधवननेही तिसरा भाग नाकारला होता. तो म्हणाला होता की, आता तो मनूची भूमिका करू शकेल असे वाटत नाही. यासोबतच त्याची तुलना अॅव्हेंजर्स सीरिजशी करताना अभिनेता म्हणाला की तिचा तिसरा भाग बनवून काही फायदा नाही.
या चित्रपटासाठी कंगनाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. कंगना सध्या तिच्या ‘तेजस’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे. यानंतर ती ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार असून, हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित आहे.