कंगनाचा “थलायवी’ 10 सप्टेंबरला ऑनलाईन रिलीज होणार आहे. कंगनाला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज व्हायला हवा होता. मात्र, आता तसे होणे शक्य नाही. त्यामुळे कंगना नाराज झाली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
डिजीटल प्लॅटफॉर्म आणि थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर थोड्या अवधीने हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज करायला देशातील 3 मोठ्या मल्टिप्लेक्स चेनने नकार दिला आहे.
मल्टिप्लेक्स मालकांनी या कठीण प्रसंगी अडवून ठेवू नये आणि एकमेकांना सहकार्य करावे, असे आवाहनही कंगनाने आपल्या इंन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये केले आहे.
चांगले सिनेमे थिएटरमध्ये रिलीज करायला फारच थोड्या प्रॉडक्शन हाऊसकडून तयारी दाखवली जाते आहे. सिनेमा तयार करायला जेवढा खर्च केला गेला आहे, तो परत मिळवणे हे आमचे कर्तव्य आहे.
हिंदी आव्रत्तीसाठी केवळ दोन आठवडे आणि दक्षिणेत केवळ चार आठवड्यांचा विंडो पीरिएड दिला जातो आहे. त्यातही मल्टिप्लेक्स आम्हाला थिएटरमध्ये रिलीज थांबवण्यासाठी दबाव आणत आहेत.
थिएटरला वाचवण्यासाठी सिनेमा थिएटरमध्येच रिलीज व्हायला पाहिजे. त्यासाठी मल्टिप्लेक्स मालकांनी सहकार्य करायला हवे. अन्यथा चांगला सिनेमा सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकणार नाही, असे कंगनाने म्हटले आहे.