मुंबई – बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या ती तिच्या या चित्रपटामुळे चांगली चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शीर्षकावरून ती चांगलीच चर्चेत असतांना तिच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे.
हि एक कपड्यांच्या ब्रँडसाठी केलेली जाहिरात असून आलियाने यामध्ये हिंदू धर्मातील कन्यादान या मुद्द्यावर व्यक्त होताना दिसत आहे. मात्र या जाहिरातीमध्ये मांडलेल्या भूमिकेवरून सध्या ती चांगलीच ट्रोल होत आहे.
यावर आता बॉलीवूडमध्ये सर्वांशी पंगा घेणारी अभिनेत्री कंगना राणावतनेही आपलं मत इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत मांडल आहे. तिने या जाहिरातींवरून आलिया भट्टवर टीका केली आहे .
कंगनाने पोस्टमध्ये म्हंटले आहे की,’हिंदू धर्माची आणि त्यांच्या चालीरितींची चेष्टा करणे थांबवा. पृथ्वी आणि स्त्री दोघांनाही शास्त्रात आई म्हटले जाते. त्यांची पूजा केली जाते. त्यांना एक मौल्यवान मालमत्ता आणि अस्तित्वाचे केंद्र मानण्यात काहीच नुकसान नाही. एखादी गोष्ट विकण्यासाठी धर्म, अल्पसंख्याक, बहुसंख्य राजकारणाचा वापर करू नका. या फूट पाडणाऱ्या कल्पना आणि जाहिरातींमुळे भोळ्या ग्राहकांना गोंधळात टाकू नका’