Kangana Ranaut Lok Sabha Elections : भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची पाचवी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये अनेक आश्चर्यकारक नावे देखील पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री कंगना राणावतला देखील भाजपने लोकसभेसाठी तिकीट जाहीर केले आहे.
भाजपने या यादीत 111 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यात नवीन जिंदाल आणि कंगना यांचा देखील समावेश आहे.भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून अभिनेत्री कंगनाला तिकीट दिले आहे. काँग्रेसचे सदस्यत्व सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या नवीन जिंदाल यांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या तासाभरात कुरुक्षेत्रातून नवीन जिंदाल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तर कंगना राणौतच्या नावानेही सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कंगना राणौतला हिमाचल प्रदेशातील मंडीतून भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. | Kangana Ranaut Lok Sabha Elections
संबित पात्रा यांना पुरीतून तिकीट मिळाले आहे. सुरेंद्रन यांना वायनाडमधून राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यात आलं आहे. रामायणात रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना मेरठ-हापर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपकडून महाराष्ट्रात या तीन जागांसाठी उमेदवार जाहीर
यानुसार सोलापुरातून भाजपने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशोक नेते यांना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. | Kangana Ranaut Lok Sabha Elections
The Central Election Committee of the Bharatiya Janata Party has decided on the following names for the upcoming General Elections to the Lok Sabha. Here is the fifth list. (2/3) pic.twitter.com/vA0hOQH4PV
— BJP (@BJP4India) March 24, 2024
कोणत्या राज्यातून किती उमेदवार?
आंध्र प्रदेशातून सहा, बिहारमधून 17, गोवा-मिझोराम-सिक्कीममधून प्रत्येकी एक, गुजरातमधून सहा, हरियाणातून चार, हिमाचल-तेलंगणामधून प्रत्येकी दोन, झारखंडमधून तीन, कर्नाटक-केरळमधून प्रत्येकी चार जणांची घोषणा करण्यात आली. ओडिशातून, राजस्थानमधून सात, उत्तर प्रदेशमधून 13 आणि पश्चिम बंगालमधून 19 उमेदवार आहेत. | Kangana Ranaut Lok Sabha Elections