मुंबई – बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना राणावत सध्या ट्विटरवर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. कंगना आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे सोशलवर नेहमी चर्चेत असते. अशातच तीने आणखी एक ट्विट करून पुन्हा एकदा आपल्या पायावर हातोडा मारून घेतला आहे.
For few past days, people gossiped, judged, online lynched a family based on one sided story at the cost of a family, I never saw the interview as sass, bahu, sajish type stuff never excites me. All I want to say is one woman the only ruling Monarch left on this globe (cont) pic.twitter.com/1RNlz9QND1
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 12, 2021
यावेळी कंगनाने थेट भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर टीका केली आहे. कंगणा राणावतने राणी एलिजाबेथ यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं. जगावर राज्य करणारी महिला शासक म्हणून एकाचं व्यक्तीचं नाव घेतलं जातं. त्या आदर्श पत्नी आणि बहीण होऊ शकल्या नाहीत. मात्र त्या एक महान राणी आहेत, असं कंगणा राणावत म्हणाली. तसेच कंगणाने जग पुरुषांच्या चुका माफ करतं. महात्मा गांधींवर त्यांच्या मुलांनी वाईट आई-वडील असल्याचा आरोप केला होता, असं कंगणा राणावतने सांगितलं.
Mahatma Gandhi was accused of being a bad parent by his own children, there are various mentions of him pushing his wife out of the house for refusing to manually clean guets toilets, he was a great leader may not a great husband but the world is forgiving when it comes to a man
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 12, 2021
अनेक उदाहरणांपैकी एक म्हणजे “महात्मा गांधी आपल्या पत्नीला घराबाहेर शौचालयाला जाण्यापासून नकार देण्यासाठी घराबाहेर काढायचे. ते एक महान नेता होते, मात्र ते महान पती नव्हते, असं एका युजरच्या ट्विटला उत्तर देत कंगणाने म्हटलं आहे. यामुळे आता कंगनाना पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात सापडली आहे.