नवी दिल्ली – ओडिशा विधानसभेत शुक्रवारी धक्कदायक घटना घडली. धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी सरकारच्या भूमिकेचा निषेध करत एका भाजप आमदाराने सभागृहातच सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे विधानसभेत एकच गोंधळ उडाला.
ओडिशातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा भाजपा आणि काँग्रेस या विरोधी पक्षांनी लावून धरला आहे. विधानसभेचे कामकाज सुरु होताच अन्न मंत्री आर.पी. स्वॅन यांनी निवेदन वाचण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी भाजप आमदार सुभाष चंद्र पाणिग्रही त्यांच्या जागेवर उभे राहिले. त्यांनी सॅनिटायझर पिण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती आता ठीक आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक काम करण्याचे दावे केले आहेत. मात्र सत्य वेगळेच आहे. माझ्याकडे हे टोकाचे पाऊल उचलण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उपलब्ध नव्हता, असे पाणिग्रही यांनी सांगितले.
Odisha: BJP MLA Subash Panigrahi attempted suicide in State Assembly by consuming sanitiser yesterday
“Paddy procurement not being done in Debgad.More than 2 lakh quintal paddy lying unsold. Attempted suicide by consuming sanitiser to draw govt’s attention to the issue,” he said pic.twitter.com/gYWSlGgMci
— ANI (@ANI) March 13, 2021