बनावट एफबी अकाउंटद्वारे कमलेश यांच्याशी हल्लेखोरांची ओळख

लखनऊ : हिंदु महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीने तिवारी यांच्याशी बनावट फेसबुक अकाउंटद्वारे संपर्क साधला होता, अशी माहिती तपासात पुढे येत आहे. आरोपी अशफाक याने रोहीत साळूंकी या नावाने खाते उघडले होते. त्याने कमलेश यांच्याशी त्याद्वारे ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

हे बनावट अकाउंट असले तरी त्याद्वारे तिवारी यांच्याशी आपुलकीचे संभाषण होत असे. अशफाकने हत्येपुर्वी कमलेश तिवारी यांच्याशी फोनवर संपर्क साधला होता. त्याने त्यांच्या संघटनेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. या संभाषणानंतरच या दोघांची भेट निश्‍चित झाली होती. हल्लेखोरांनी येण्यापुर्वी 10 मिनिटे आधी तिवारी यांच्याशी संपर्क साधला होता, अशी माहिती तिवारी यांचा कर्मचारी कर्मचारी सवरजित सिंह याने पत्रकारांना दिली.

तिवारी यांच्याशी भेट निश्‍चित झाल्यावर आशफाकने त्यांचे कार्यालय गाठले. तेथे दोघांच्यात अर्धातास संभाषण झाले. त्यानंतर त्यांनी सवरजित सिंह याला सिगारेट आणण्यासाठी बाहेर पाठवले, त्यानंतर तिवारींवर हल्ला केला. भगव्या वेशात तिवारींच्या कार्यालयात आलेल्या हल्लेखोरांनी मिठाईच्या बॉक्‍समधून चाकू आणि गावठी कट्टा आणला होता., असेही ततपास करणाऱ्या विशेष पथकातील सुत्रांनी सांगितले.

तिवारींच्या आई योगींवर असमाधानी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कमलेश यांच्या मातेने भेट घेतली. त्यानंतर याबेटीबाबत त्यांनी असमाधान व्यक्त केले. योगी आदित्यनाथ यांच्या भेटीने मला समाधान वाटले नाही. मी प्रचंड दडपणाखाली त्यांना भेटण्यास गेले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)