बॉक्सऑफिसच्या आधी कोर्टात भिडणार ‘बाला’ व ‘उजडा चमन’

मुंबई- बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाच्या आगामी ‘बाला’ चित्रपटाचा नुकताच ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट अकाली टक्कल पडण्याच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या तरुणांची व्यथा सांगणार आहे. बाला चित्रपटात आयुष्मान बरोबर अभिनेत्री यामी गौतमी आणि भूमी पेडणेकरही मुख्य भूमिकेत असणार आहेत.

दरम्यान, बाला चित्रपटा पाठोपाठ आणखी एक मिळता जुळता ‘उजडा चमन’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेता ‘सनी सिंग’ प्रमुख भूमिकेत आहे. ‘बाला’ व ‘उजडा चमन’ हे दोन चित्रपट बॉक्सऑफिसच्या आधी न्यायालयात आमनेसामने येणार आहेत. ‘

उजडा चमन’चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी ‘बाला’च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘बाला’ चित्रपटातील तब्बल 15 दृश्ये ‘उजडा चमन’ मधील दृश्यांशी जुळणारी असल्याचा आरोप मंगत पाठक यांनी केला आहे. ‘बाला’ चित्रपट 7 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर, ‘उजडा चमन’ 8 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.