निदर्शकांचे ब्लॅंकेट आणि खाद्यपदाथर पोलिसांकडून जप्त; समाज माध्यमांत निषेधाची लाट
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील का विरोधातील निदर्शने पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. शहरतीाल ऐतिहासिक घडयाळ टॉवरजवळ सुमारे 50 महिला निदर्शने करत आहेत. त्यांच्यासाठी आणलेले ब्लॅंकेट, खाद्या पदार्थ आणि ते खाण्यासाठी आणलेली भांडी पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर कंबलचोर युपी पुलीस हा ट्विटरवर ट्रेंडिग होऊ लागला.
सुमारे 50 महिलांनी का विरोधी निदर्शने शुक्रवारी सुरू केली. शनिवारी त्यात शेकडो महिला आणि बालके सहभागी झाली. पोलिसांनी घटनास्थळावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. त्यानंतर शिघ्र कृती दलाच्या जवानांनी तेथून ध्वज संचलन केले. या निदर्शकांसाठी आणलेले ब्लॅंकेट आणि खाद्यपदार्थ आणि भांडी जप्त करून नेतानाचे व्हिडिओ निदर्शकांनी पोस्ट केले.
शनिवारी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला रविवारी मोठा प्रतिसाद मिळाला. हॅशटॅग कंबलचोर अंडरस्कोर युपी पोलिस हा ट्रेंड अस्तित्वात आला.
दरम्यान , या भागात जमावबंदीचे कलम लागू असल्याने या निदर्शकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ही निदर्शने बेकायदा आहेत. तेथे निदर्शने करण्यास परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पोलिस उपायुक्त विकास चंद्र यांनी सांगितले.
पोलिस उपायुक्त त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार या बेकायदा धरण्यात काही संस्था ब्लॅंकेट वाटत होत्या. ते घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले. ते काही निदर्शक नव्हते. त्यामुळे नागरिकांनी अफवा पसरवू नयेत
ब्लॅंकेटना कायदेशीररित्या ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लखनऊमधील क्लॉक टॉवरजवळील का विरोधी निदर्शने दिल्लीतील शाहीनबाग येथील निदर्शनांची आठवण करून देतआहेत. 15 डिसेंबरपासून येथे शांततामय निदर्शने सुरू आहेत.