Entertainment : अभिनेत्री काजल अग्रवालने Kajal Aggarwal) चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलूने नवीन घर खरेदी केले आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
काजलने इनस्टाग्रामवर कुटुंबासोबत गृहप्रवेश केल्याचे फोटो शेअर केले आहे. यावेळी काजल आणि गौतम पूजा करत असल्याचे दिसत आहे. गृहप्रवेशादरम्यान काजलने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. सोबतच मुलगा नीलने देखील गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. नवीन घरात शिफ्ट झाल्याचा आनंद काजोलच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. या पोस्टनंतर काजलवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, काजल अग्रवालने 19 एप्रिल रोजी नीलच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याचे अतिशय गोंडस फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. कोरोनाच्या काळात काजलने 30 ऑक्टोबर 2020 रोजी गौतम किचलूशी लग्न केले. या लग्नाला नातेवाईकांसह जवळची मित्रमंडळी उपस्थित होती. काजलने जानेवारी 2022 रोजी तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आणि 19 एप्रिल 2022 रोजी तिने मुलगा नीलला जन्म दिला. काजल अग्रवालने तेलगू, तामिळसह अनेक चित्रपटात काम केले आहे. अभिनेता अजय देवगणसोबत ती ‘सिंघम’ चित्रपटात देखील दिसली होती.