मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या चित्रपटांसोबतच फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. दीपिका नेहमीच ड्रेसवर प्रयोग करत असते. तसे, प्रत्येक प्रकारचा ड्रेस तिला सूट करतो.
पारंपरिक ड्रेसपासून ते वेस्टर्नपर्यंत प्रत्येक लुकमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसते. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईला गेले आहेत. याप्रसंगी तिने पिंक कलरच्या गाऊनमधील तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दीपिका पादुकोण गुलाबी रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दीपिकाच्या या लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दीपिकाने या लुकमध्ये वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केले आहे.
दीपिकाचा हा लुक पाहून चाहते वेडे झाले आहेत. या फोटोंवर तिचा नवरा रणवीर सिंहनेही कमेंटमध्ये हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. दीपिका आणि रणवीर त्यांच्या “83′ चित्रपटाच्या
प्रमोशनसाठी दुबईला गेले होते. जिथे रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता. यावेळी दीपिकाने हा ड्रेस परिधान केला होता.