जुन्नर -जुन्नर तालुक्यात गुरुवारी नव्याने 50 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर हिवरे खुर्द येथील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
नारायणगाव 11, ओतूर 6, आळे 5, जुन्नर नगरपालिका व अंजनावळे प्रत्येकी 4, माणकेश्वर व हिवरे तर्फे नारायणगाव प्रत्येकी 3, राजुरी, उदापूर, तेजेवाडी प्रत्येकी 2, तर खोडद, ओझर, आर्वी, बल्लाळवाडी, हिवरे खुर्द, उंब्रज नं. 2, पिंपळगाव तर्फे नारायणगाव आणि वडगाव आनंदमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 6720 झाली असून, 6148 उपचारानंतर बरे झाले आहेत. 263 जणांचा या आजाराने बळी घेतला असून, 309 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.