नवी दिल्ली – ‘RRR’ चित्रपटाच्या यशानंतर, ज्युनियर एनटीआर पुन्हा एकदा मोठ्या पडद्याद्वारे त्याच्या चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्युनियर एनटीआरने त्याच्या आगामी ‘देवरा’ चित्रपटासाठी पुन्हा एकदा कोराताला शिवासोबत काम केले आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर, प्रकाश राज आणि सैफ अली खानसारखे अनेक मोठे स्टार्स दिसणार आहेत. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 250 दिवस उरले आहेत. अशात निर्मात्यांनी या प्रकल्पाबद्दल चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
250 days to witness fear unleash on the big screen 💥🌊
Vastunna….#Devara from 5th April 2024. pic.twitter.com/CCaARI8Fwm
— Devara (@DevaraMovie) July 30, 2023
चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘देवरा’चा नवीन प्रोमो व्हिडिओ रिलीज केला आहे. विशेष बाब म्हणजे या प्रोमो व्हिडिओमध्ये ज्युनियर एनटीआरचा आवाज आहे जो चाहत्यांचा उत्साह वाढवत आहे. अतिशय क्रिएटिव पद्धतीने हा प्रोमो चाहत्यांसमोर ठेवण्यात आला आहे. लाइटनिंग, लाईट हाऊस, समुद्राच्या लाटांमध्ये रक्ताचे थेंब आणि या सगळ्यामागे ज्युनियर एनटीआरचा आवाज ऐकायला येत आहे या प्रोमो व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.
‘देवरा’ चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, चित्रपटाच्या रिलीजला आता 250 दिवस उरले आहेत. मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी फक्त 250 दिवस. 5 एप्रिल 2024 पासून ‘देवरा’ पहा.’ असं लिहत या चित्रपटाची रिलीज डेट शेअर करण्यात आली आहे.