मुंबई – साउथ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार ज्युनियर एनटीआर त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच आरआरआर चित्रपटाने धुमाकूळ घातला. यातील ज्युनियर एनटीआर च्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
या चित्रपटाने 1 हजार कोटींपेक्षा जास्तीचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता ज्युनियर एनटीआरने एक मोठा निर्णय घेतला आहे. एनटीआरने हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान दीक्षा घेतली आहे. यामुळे आता तो 21 दिवस अनवाणी पायाने राहणार आहे
सध्या सोशल मीडियावर ज्युनियर एनटीआर भगव्या कपड्यातील फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये भगव्या रंगाचा कुर्ता-पायजामा, गळ्यात माळ आणि कपाळावर तिळा लावलेला तो दिसून येत आहे. तर सोशलवर या फोटो सोबत याचदरम्यानचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये ज्युनियर एनटीआर मंदिरात पूजा करताना आणि अधिक दीक्षा घेताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एनटीआर हनुमान जयंतीपासून पुढील 21 दिवस अनवाणी राहून सात्विक आहार घेणार आहे.