नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांत महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महागाई भत्ता (DA) 31 वरून 34 टक्के केल्यानंतर घरभाडे भत्ता (HRA) वाढवण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. वास्तविक, महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर इतर भत्तेही वाढत असतात.
जुलैमध्ये जेव्हा महागाई भत्ता 25% च्या वर गेला तेव्हा HRA मध्ये सुधारणा करण्यात आली होती. सरकारने जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता वाढवून 28 टक्के केला होता. सध्या, HRA दर 27%, 18% आणि 9% आहे. आता महागाई भत्ता 34% पर्यंत वाढला आहे, त्यानंतर HRA देखील वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र DA नंतर HRA मध्ये पुढील सुधारणा कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग (DOPT) नुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल महागाई भत्त्याच्या आधारावर करण्यात येतो. आता 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के दर 1 जुलै 2021 पासून लागू आहेत. 2016 मध्ये सरकारने जारी केलेल्या निर्णयात, HRA वाढवताना, डीएमध्ये वेळोवेळी सुधारणा केली जाईल, असे म्हटले होते.