बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून जूही चावला ओळखली जाते. नव्वदच्या दशकात आलेल्या अनेक चित्रपटांत जूहीने आपल्या अभिनय आणि रुपाने राज्य केले. तीने इश्क, कयामत से कयामत तक, डर, हम है राही प्यार के, यस बॉस, मिस्टर अँड मिसेस खिलाडी असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
आता जूही खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. 51 वर्षांची जूही ही लवकरच वेब चित्रपटात दिसणार आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी मला कधीही पाहिल नसेल अशा भूमिकेत मी दिसणार आहे. ही भूमिका स्वीकारताना मी अनेकदा विचार केला. मला हे जमू शकत का? हा प्रश्न मला सतावत होता. या भूमिकेत मला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल हे नक्की, असे जूही म्हणाली. तूर्त या वेब चित्रपटाबद्दल अधिकची माहिती जूहीन गुलदस्त्यात ठेवण पसंत केल आहे. मात्र लवकरच ती वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.
जूहीने यापुर्वी एकदा आपल्या चौकटीतून बाहेर येत एक आव्हानात्मक भूमिका स्वीकारली होती. ही भूमिका होती गुलाब गॅंग चित्रपटातली. या चित्रपटात जूहीने पहिल्यांदा खलनायिका साकारली. रुपेरी पडद्यावरची गुणी अभिनेत्री म्हणून मिळवलेल्या प्रतिमेला छेद देत तिन खलनायिका रंगवण्याचे आव्हान स्वीकारल आणि ते यशस्वी करुनही दाखवले होते.