भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर भूटानमध्ये कोसळले

योंगफुला (भुटान) – भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर शुक्रवारी भूतानमध्ये कोसळल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. मिळालेल्या वृत्तानुसारने या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर लष्करी कामासाठी अरुणाचल प्रदेशमधील खिरमू येथून भूतानमधील योंगफुल्ला येथे निघाले होते.

मृतांमध्ये एक भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल श्रेणीच्या लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. तर भूतानमधील एका लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. भूतानमधील लष्करी अधिकारी भारतीय अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

विमान आणि हेलिकॉप्टर कोसळण्याची वर्षभरातील ही 11 वी घटना आहे. वर्षभरात 9 लढाऊ विमाने आणि 2 हेलिकॉप्टर कोसळले असून त्यात 12 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापूर्वी रायगड जिल्ह्यातील मुरुडजवळच्या नांदगावात तटरक्षक दलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत होलिकॉप्टरमधील एक महिला जखमी झाली होती, तर तीनजण जखमी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.