मुंबईः ‘पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बॅंके’च्या (पीएमसी) कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने आज पीएमसी बॅंकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक केली. या प्रकरणात ही तिसरी अटक आहे. पीएमसी बॅंकेचे कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. आज अटक करण्यात आलेल्या जॉन थॉमस यांना बॅंकेने आधीच निलंबित केले आहे.
पीएमसी बॅंकेचं कर्ज बुडवणारे एडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पीएमसी बॅंकेचं कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण मोठ्या खात्यांपैकी खाती ही एचडीआयएल आणि वाधवा यांच्याशी संबंधित आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या दोघांनाही चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, तपासात सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची जवळपास तीन हजार 500 कोटींची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे.