सांधे प्रत्यारोपण आणि वुंड क्‍लोजर

सांधेरोपण शस्त्रक्रियेच्या जागी होणाऱ्या प्रादुर्भावांचे प्रमाण भारतात जगातील अन्य देशांशी तुलना करता अधिक असल्यामुळे वुंड क्‍लोजर (शस्त्रक्रियेसाठी केलेली जखम बंद करणे) व्यवस्थापनातील, विशेषत: सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमधील वुंड क्‍लोजरसंदर्भात नवीन प्रगतीच्या लाभांविषयी माहिती घेणे गरजेचे आहे. मऊ पेशींच्या (सॉफ्ट टिश्‍यू) व्यवस्थापनाबद्दल जागरूकता वाढवणे गरजेचे आहे.

रुग्णांना जलदगतीने गमनशीलता (मोबिलिटी) परत मिळावी, कमीत-कमी व्रण राहावे, प्रादुर्भावाचे प्रमाण कमी व्हावे, रुग्णांना स्वत:ची काळजी स्वत: घेणे सोपे व्हावे आणि अधिक चांगल्या दर्जाच्या आयुष्याची हमी मिळावी या दृष्टीने उपचारांची प्रक्रिया सुधारण्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान वापरता येते.

सध्या पुण्यात ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांच्या सुमारे 15 हजार केसेस आहेत. यामध्ये संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण, संपूर्ण नितंब (हिप) प्रत्यारोपण, रिव्हिजन शस्त्रक्रिया तसेच रोबोटिक्‍स शस्त्रक्रियांचा समावेश आहे. या प्रगत प्रणालींमुळे मिनिमली इन्वेजिव स्वरूपाची त्वचा शिवण्याची (स्किन क्‍लोजर) तंत्रे उपलब्ध होतील. यामुळे रुग्णांचे समाधानही होईल आणि सौंदर्याच्या दृष्टीनेही शस्त्रक्रिया अधिक चांगल्या ठरतील.

अशा शस्त्रक्रियेच्या जागी होणाऱ्या प्रादुर्भावांचा (एसएसआय) धोका टाळण्यासाठी वुंड क्‍लोजर हे तंत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. एसएसआयमुळे अनेकदा रुग्णांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागते आणि त्यामुळे एकंदर आरोग्यसेवा प्रणालीवर अधिक खर्चाचा बोजा पडतो. केवळ एशिया पॅसिफिक प्रदेशात रुग्णांना एसएसआय ओग्यसेवेशी संबंधित प्रादुर्भावाचा धोका 20 पटीने अधिक आहे.

निम्न व मध्यम उत्पन्न गटांतील देशांमध्ये दहा रुग्णांपैकी एकापेक्षा जास्त रुग्णाला शस्त्रक्रियेच्या जागी प्रादुर्भाव होतो अशी जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी आहे. काटेकोर लक्ष ठेवण्यात तसेच जागतिक मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीत कुचराई केल्यामुळे आशिया पॅसिफिक प्रदेशात एसएसआय रोखण्याच्या प्रयत्नांमध्ये बाधा येत आहे. त्यामुळे आशिया पॅसिफिक देशांतील मृत्यूदर 46 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला आहे.

शिवाय, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियात्मक प्रक्रियेतील एसएसआय प्रादुर्भावामुळे रुग्णाला रुग्णालयात ठेवण्याचा कालावधी दोन आठवड्यांपर्यंत वाढू शकतो आणि त्याची काळजी घेण्याचा खर्च 300 टक्‍क्‍यांनी वाढतो. ऑर्थोपेडिक प्रक्रियांमधील एसएसआयमुळे रुग्ण, सर्जन्स व रुग्णालयातील संरचनेला टोकाच्या व संकटात टाकणाऱ्या गुंतागुंतींना तोंड द्यावे लागते. संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील एसएसआयची वाढती शक्‍यता असते.

जगभरात सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपुढील सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे प्रादुर्भाव. ही एक गोष्ट कोणीही नाहीशी करू शकलेले नाही. म्हणूनच प्रादुर्भावाचा धोका कमी करणारी तंत्रज्ञाने स्वीकारणे हे ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियात्मक प्रक्रियांपुढील महत्त्वाचे ध्येय आहे. विशेषत: टोटल नी आणि टोटल हिप आर्थ्रोप्लास्टीत हे महत्त्वाचे आहे. सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांतील वुंड क्‍लोजर व्यवस्थापनात झालेल्या नवीन प्रगतीमुळे रुग्णांच्या बदलत्या गरजा पूर्ण करून त्यांना अधिक चांगले उपचारही देता येत आहोत.

या प्रणालींमुळे ड्रेनेज/हेमाटोमा/एसएसआय यांचे प्रमाण कमी झाले आहे, जखम घट्ट शिवणारी ही तंत्रे आहेत, ही शिवण रुग्णांना त्यांच्या घरी सोयीस्कररीत्या काढून टाकता येते. त्यामुळे रुग्णालयातील फेऱ्या कमी होतात. ड्रेसिंगमध्ये स्टेपल्सच्या (स्किन क्‍लिप्स) तुलनेत कमी वेदना होतात आणि सौंदर्यदृष्ट्याही उत्तम परिणाम साधता येतो.

ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांदरम्यान सॉफ्ट टिश्‍यूंच्या व्यवस्थापनाकडे पूर्ण लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अन्यथा वेदना, ड्रेनेज, हेमाटोमाज, प्रादुर्भाव, पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागणे आणि अन्य गुंतागुंती निर्माण होतात. शस्त्रक्रियेच्या वेळी वुंड क्‍लोजर प्रणालींकडे लक्ष दिल्यास सर्जनची अचूकता वाढते आणि रुग्णही लवकर बरा होतो.

सर्जनने तसेच रुग्णाने शस्त्रक्रियेदरम्यान व शस्त्रक्रिया झाल्यानंतर जखमेकडे नीट लक्ष दिल्यास शस्त्रक्रियेच्या जागी प्रादुर्भावाचा धोका कमीत-कमी करणे शक्‍य आहे. रुग्णाच्या दृष्टीने चांगले उपचार आणि रुग्णाचे समाधान हे कोणत्याही वैद्यकीय प्रक्रियेपुढील महत्त्वाचे उद्दिष्ट असते. ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांबाबत काही बाबी समजून घेणे आवश्‍यक आहे. यामध्ये रुग्णांमधील असमाधानाला कारणीभूत ठरणारी काही आव्हाने आहेत.

स्टेपल्स किंवा टाके काढण्यासाठी क्‍लिनिकला जावे लागणे, सुपरफिशिअल इंजेक्‍शन्स, पू तयार होणे, जखम दुभागून उघडी पडणे, जखमेतून दीर्घकाळ पाणी जात राहणे, रुग्णालयात पुन्हा दाखल व्हावे लागणे आणि पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणे ही रुग्णाच्या असमाधानामागील काही कारणे आहेत. डॉक्‍टर किंवा अन्य कोणाकडून काढून घेण्याची गरज पडणार नाही असे टाके आणि यासारख्या अन्य काही जखम बरी होण्यातील जटीलता दूर करणाऱ्या वुंड क्‍लोजर पद्धती वापरणे हितकारक आहे.

डॉ. रायन एम. ननले
डॉ. नरेंद्र वैद्य/डॉ. नीरज आडकर

Leave A Reply

Your email address will not be published.