रोहित शर्माच्या व्दिशतकाने भारताचा वरचष्मा

रांची : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने द. अफ्रिकेचे दोन गडी झटपट बाद करत वरचष्मा मिळवला. ततपुर्वी रोहीत शर्माचे तडाखेबंद द्विशतक आणि अजिंक्‍य राहणेच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने 9 बाद 497 धावांचे आव्हान ठेवले. त्याला तोंड देताना अफ्रिकेचे दोन गडी अवघ्या आठ धावा काढून तंबूत परतले.

दक्षिण अफ्रिकेची फलंदाजी सुरू होताच अवघ्या पाच षटकांत अपुऱ्या प्रकाशा अभावी सलग दुसऱ्या दिवशी सामना थांबवावा लागला. दुसऱ्या दिवशीही सामन्यावर छाप पडली ती रोहीत शर्माचीच.

117 धावा काढून मैदानात उतरलेल्या रोहीतने आज द. अफ्रिकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्याने द्विशतक झळावत वन डे आणि कसोटीत द्विशतक झळकावणऱ्या ब्रायन लारा, सचिन तेंडूलकर आणि ख्रिस गेल यांच्या पंक्तीत स्थान मिळवले.

अजिंक्‍य रहाणेनेही मायदेशात तीन वर्षांनंतर शतक झळावत भारताला सन्मानजनक स्थितीत पोहोचवले. रबाडाला हूक मारण्याच्या नादात रोहीत बाद झाल. तर शतक झळवून अजिंक्‍य माघारी परतला. त्यानंतर उमेश यादवने अवघ्या 10 चेंडूच्या खेळीत पाच षटकारासह 31 धावा झोडपून काढल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.