खेड शिवापूर टोल नाका, वेळु फाटा, चेलाडी फाटा, कापूरहोळ चौक व निगडे या भागात वाहतूक कोंडी
कापूरहोळ – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजवण्यासाठी अनके नागरिक मतदान करण्यासाठी आपल्या गावाकडे निघाला आहेत. दरम्यान, यावेळी पुणे-सातारा रस्त्यावर रविवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली.
खेड-शिवापूर टोल नाक्यावर तसेच वेळूफाटा चेलाडी, वरवे आणि निगडे येथील सेवा रस्त्यावरील मोठ्या खड्डयांमुळे या ठिकाणी सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा असून, महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नागरिकांची मोठी फजिती झाली.