बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम स्टारर “सत्यमेव जयते 2′ हा चित्रपट या वर्षी एप्रिल महिन्यात फ्लोर
करण्यात येणार होता. पण करोना व्हायरमुळे तो पोस्टपोन करण्यात आला आहे. त्यानंतर आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने पुढील महिन्याभरात पुन्हा एकदा मोठया उत्साहात चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात येणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप झावेरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,
लॉकडाउनच्या काळात स्क्रिप्टवर आणखी काम करण्यात आले. यात एक बदल करण्यात आला असून लखनौमध्ये लवकरच शूटिंग सुरू करण्यात येणार आहे.
“सत्यमेव जयते 2′ हा ऍक्शन पॅक्ड कॉप ड्रामा आहे, जो मुंबईत शूट करण्यात येणार होता. मिलाप झावेरी म्हणाले, चित्रपटाच्या पहिल्या भागात भ्रष्टाचाराविरोधातील लढाई दाखविण्यात आली होती. आता पार्ट-2मध्ये सर्व क्षेत्रातील म्हणजे पोली, राजनेता, उद्योगपती, सर्वसामान्यांच्या भ्रष्टाचाराविरोधत लढाई दाखविण्यात येणार आहे.
दरम्यान, 2018मध्ये “सत्यमेव जयते’ प्रदर्शित झालेला चित्रपट हिट ेठरला होता. यानंतर या चित्रपटाच्या
सिक्वलची घोषणा करण्यात आली. हा सिक्वल ऑक्टोंबर-2020मध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता. पण लॉकडाउनमुळे सध्या चित्रपटाचे शूटिंग रखडले आहे. यात जॉन अब्राहमसोबत दिव्या खोसला कुमार झळकणार आहे.