जॉन अब्राहमने वेगवेगळ्या प्रकारचे रोल केले आहेत. पण त्याची ओळख रफ ऍन्ड टफ हिरो म्हणून कायम राहिली आहे. धूम, फोर्स, परमाणू- द स्टोरी ऑफ पोखरण, सत्यमेव जयते, रोमिओ अकबर वॉल्टर आणि बाटला हाऊस या सिनेमांनी जॉनला बॉलीवूडमध्ये एक विशिष्ट स्थान मिळवून दिले आहे.
आता आगामी अटॅकमध्ये जॉनी चक्क ट्रिपल रोलमध्ये दिसणार आहे. मात्र अद्याप त्याची अधिकृत घोषण करण्यात आलेली नाही. हा सिनेमा देशभक्तीवरच्या एका सत्यघटनेवर आधारलेला आहे. जॉनच्या बरोबर जॅकलीन फर्नांडिस असणार आहे. जॉन आणि जॅकलीनने यापूर्वी हाऊसफुल्ल 2, रेस 2 आणि ढिशूममध्ये एकत्र काम केले आहे.
View this post on Instagram
Thank you @dabbooratnani for a fantastic picture!!! @manishadratnani #DabbooRatnaniCalendar
त्या दोघांशिवाय रकुल प्रीत सिंह देखील लीड रोलमध्ये दिसणार आहे. जर जॉन ट्रिपल रोलमध्ये दिसणार असेल, तर तिसरी हिरोईनपण दिसायला हवी. ती कोण असेल, हे अद्याप समजलेले नाही. किंवा नेहमी प्रमाणे डबल रोल असलेल्या सिनेमांप्रमाणे एक हिरो आणि दुसरा व्हिलन अशा रोलमध्येही जॉनला सादर केले जाऊ शकते. अटॅक या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात रिलीज होण्याची शक्यता आहे.