साउथमधील सुपरस्टार यशच्या केजीएफ चित्रपटाला प्रेक्षकांनी खूपच पसंती दर्शविली होती. हा कन्नड चित्रपटामधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. त्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी त्याचा सिक्वल काढण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातील स्टार कास्ट आणि पोस्टरमुळे सध्या हा चित्रपट खूपच चर्चेत आहे. आता केजीएफ-2मध्ये रवीना टंडनला स्टार कास्टच्या यादीत एंट्री देण्यात आली असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
सध्या रवीना टंडनचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात ती चित्रपट निर्माता प्रशांत नीलसोबत पोज देताना दिसत आहे. यात व्हाइट ड्रेसमध्ये रवीना टंडन खूपच सुंदर दिसत आहे. तर प्रशांत नील ब्ल्यू टी-शर्टमध्ये कूल दिसत आहे.
केजीएफ-2मध्ये रवीना टंडनशिवाय संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी आणि अनंत नाग महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट कन्नड, मल्ल्याळम, हिंदी, तमिल आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, केजीएफ-2चा फर्स्ट लुक पोस्टरही शेअर करण्यात आले होते. ज्यात खलनायक अधीराच्या भूमिकेत संजय दत्त एकदम हटके लुकमध्ये दिसला होता. त्याचा लुक पाहता चाहत्यांमधील चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.