”अन् चिमणी गिधाडांना भारी पडली”

केंद्र सरकार-ट्विटर वादावर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

नवी दिल्ली – भारत सरकारने माहिती तंत्रज्ञानाच्या संबंधात जे नवीन कायदे केले आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याची शेवटची नोटीस ट्विटरला बजावली आहे. या आधीच्या नोटिशीला ट्विटरने प्रतिसाद दिला नव्हता.

त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्यावर आणखी एक नोटीस जारी करीत त्यांना आणखी एक शेवटची संधी दिली आहे. भारत सरकारने भारतीय कायद्यानुसार ट्विटरवर गंभीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्या कंपनीला दिला आहे. ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्‌विटर खात्याला जी ब्लूटिकची जी अनुमती दिली होती, ती ट्विटरने आज काही तासांसाठी काढून घेतली, पण नंतर ती लगेच जारी केली.

मात्र, त्यावरून सोशलवर बरंच नाट्य रंगलं. यात केंद्राने ट्विटरला अखेरचा इशाराही दिला. या सगळ्या घटनाक्रमावर गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सरकारला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

त्यांनी ट्विट करत केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये  ट्विटरचा चिमणी असलेला लोगो आहे. या ‘लोगो’ला भगव्या रंगाने वेढा दिला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आणि त्यातच ट्विटर हे नाव दिलेलं आहे. याबरोबरच “चिमणी गिधाडांना भारी पडली” असं कॅप्शन देत  सरकारला अप्रत्यक्षपणे टोला  लगावला आहे.  

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.