पुणे, दि. 23 – आयटी सिटी पुणे शहरात जिओ कंपनीने 5 जी सेवा सुरू केली आहे. ज्यामुळे पुणेकरांना 1 जीबीपीएस + पर्यंतच्या स्पीडमध्ये अमर्यादित 5 डेटा मिळेल. जिओने शहराचा मोठा भाग त्याच्या स्टॅंडअलोन ट्रू 5-जी नेटवर्कने कव्हर केल्यानंतरच शहरामध्ये त्याच्या ट्रू-5 जी नेटवर्कची बीटा चाचणी सुरू केली.
या घोषणेवर भाष्य करताना जिओचे प्रवक्ते म्हणाले, “देशातील 12 शहरांमध्ये जिओ ट्रू-5 जी लॉंच केल्यानंतर, मोठ्या संख्येने जिओ वापरकर्त्यांनी जिओ वेलकम ऑफरमध्ये नावनोंदणी केली आहे. ज्यामुळे जिओला ग्राहक आणि सेवा फीडबॅकसह जगात कुठेही सर्वात प्रगत 5-जी नेटवर्क तयार करण्यात मदत होईल. जिओच्या ट्रू-5 जी नेटवर्कवरील डेटा वापर जिओच्या 4 जी नेटवर्कवर वापरल्या जाणाऱ्या सध्याच्या डेटापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. विशेष म्हणजे हा डेटा अनुभव 500 एमबीपीएस ते 1 जीबीपीएस दरम्यान कुठेही ब्रेक-नेक स्पीडमध्ये आणि अत्यंत कमी लेटन्सीवर वितरित केला जात आहे. ज्यामुळे विविध क्षेत्रातील यूज्ड केसेस सक्षम होतात. ज्या केवळ ट्रू-5 जी नेटवर्कमुळेच प्रत्यक्षात येऊ शकतात.
पुण्यामध्ये विद्यार्थीसंख्या मोठी आहे आणि ते एक आघाडीचे आयटी हब, तसेच भारतातील सर्वात महत्त्वाचे ऑटोमोबाइल आणि उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाते. जिओ ट्रू 5 जी पुणेकरांसाठी खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरेल. दि.23 नोव्हेंबरपासून, पुण्यातील जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1 जीबीपीएस स्पीडपर्यंत अमर्यादित डेटाचा अनुभव घेता येणार आहे.