मल्लपुरम् : बंगालच्या उपसागराच्या समोर असणाऱ्या शेकडो वर्ष पुरातन असणाऱ्या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपींग यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला. भारतीय पारंपरिक नृत्य कथकली आणि भरत नाट्यमच्या सादरीकरणातून भारतीय परंपरेची पाळेमुळे दर्शवण्यात आली.
या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यापुर्वी जीनपींग यांना अर्जुनाने रपश्चर्या केलेले स्थळ, कृष्णाचा लोण्याचा गोळा आणि मल्लपुरम्मधील किनारावर्ती मंदिरांची सैर घडवून आणली. हे शहर पांडव कालीन लेणी आणि मंदिरासाठी प्रसिध्द आहे.
तत्पुर्वी, पारंपरिक वेष्टी परिधान केलेल्या मोदी यांनी जीनपींग यांचे स्वागत केले. जीनपींग यांनी पांढरा फुल शर्ट आणि काळी पॅंट परिधान केली होती. तर मोदी यांनी वेष्टी, अंगवस्त्रम् आणि अर्ध्या बाह्यांचा शर्ट परिधान करून अस्सल भूमिपूत्र शोभत होते.