मुंबई – कोरोना विषाणूचा वाढता फैलाव पाहत सध्या देशात गेल्या तीन महिन्यांहून अधिक दिवस झाले लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे देशात सर्वच काही ठप्प आहे. याचा फटका कलाविश्वाला देखील बसलाअसून, सर्वच कलाकार आपल्या घरात बसून आहेत.
दरम्यान, चित्रीकरण बंद असल्याने बॅकग्राउंड डान्सर यांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्वांच्या मदतीसाठी आता बॉलिवूड अभिनेता ‘वरून धवन’ याने मोठा मदतीचा हात पुढे केला. लॉकडाऊनमध्ये वरुणने बॅकग्राऊंड डान्सरच्या खात्यात थेट रक्कम पाठवली आहे. राज सुरानी या डान्सरने याबाबतची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली आहे.
वरूण धवनच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर, 90 च्या दशकातील सुपरहिट ‘कुली नंबर 1’ चित्रपटाच्या रिमेक मध्ये वरून झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान देखील मुख्य भीमीकेत दिसून येणार आहे. त्यामुळे हा चित्रपट सिनेरसिकांसाठी एक चांगली मेजवानी ठरणार हे नक्कीच.