जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येची 34 हजारांकडे वाटचाल

नगर -जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येची 34 हजारांकडे वाटचाल सुरू असून, आज तब्बल 906 बाधितांची रुग्णसंख्येत भर पडली आहे. आज रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण रुग्णसंख्या 33 हजार 813 झाली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांनी दिली. 

दरम्यान, जिल्ह्यात आज तब्बल 840 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 28 हजार 512 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 84.32 टक्के इतके झाले आहे. काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 906 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4768 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 96, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 403 आणि अँटिजेन चाचणीत 407 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 45, संगमनेर 5, राहाता 1, नगर ग्रामीण 17, श्रीरामपूर 1, कॅन्टोन्मेंट 1, नेवासे 7, श्रीगोंदा 4, अकोले 1, राहुरी 2, जामखेड 1, मिलिटरी हॉस्पिटल 11, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 403 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली.

यामध्ये मनपा 163, संगमनेर 10, राहाता 23, पाथर्डी 5, नगर ग्रामीण 54, श्रीरामपूर 21, कॅन्टोन्मेंट 9, नेवासे 19, श्रीगोंदा 7, पारनेर 29, अकोले 13, राहुरी 31, शेवगाव 3, कोपरगाव 7, जामखेड 6 आणि कर्जत 3, अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजेन चाचणीत आज 407 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 17, संगमनेर 29, राहाता 41, पाथर्डी 30, नगर ग्रामीण 13, श्रीरामपूर 18, कॅंटोन्मेंट 4, नेवासे 64, श्रीगोंदा 22, पारनेर 12, अकोले 9, राहुरी 66, शेवगाव 24, कोपरगाव 29, जामखेड 19 आणि कर्जत 10, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 840 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

यामध्ये मनपा 250, संगमनेर 62, राहाता 69, पाथर्डी 5, नगर ग्रामीण 56, श्रीरामपूर 78, कॅन्टोन्मेंट 14, नेवासे 40, श्रीगोंदा 37, पारनेर 25, अकोले 27, राहुरी 42, शेवगाव 46, कोपरगाव 21, जामखेड 32, कर्जत 28, मिलिटरी हॉस्पिटल 8, अशा रुग्णांचा समावेश आहे.

नगर करोना अपडेट
बरे झालेली रुग्ण संख्या : 28,512
उपचार सुरू असलेले रूग्ण : 4,768 आजपर्यंतचे मृत्यू : 533
एकूण रूग्ण संख्या : 33,813

Leave A Reply

Your email address will not be published.