राजेंद्र वाघमारे
नेवासा – हिंदी आणि मराठी चित्रपसृष्टीतील प्रख्यात संगीतकार अजय – अतुल यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहूरी तालुक्यातील वांजूळपोई येथील इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या जयेश खरे याने चंद्रा गाणे गात असतांना त्याचे वर्ग शिक्षक कृष्णा राठोड यांनी जयेशच्या गाण्याचे छायाचिञण केले होते.
त्यामुळे जयेशचा आवाज थेट प्रख्यात संगितकार अजय – अतुल यांच्या पर्यंत पोहचला आणि हा आवाज हेरुन या छोट्या कलाकाराला थेट ‘महाराष्ट्र शाहिर’ या चिञपटात गाण्याची संधी दिली आणि हा बालकलाकार जयेश एका राञीत हिरो झालेला अाहे आता जयेश पुन्हा आज बुधवार (दि.९) ऑगस्टपासून झी टीव्हीच्या मराठीच्या सारेगामापा ‘लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमात तो गाणे गातांना दर बुधवारी आणि शनिवारी राञी साडेनऊ वाजता राज्यातील प्रेक्षकांना दिसणार आहे.
कुणाचे नशीब कधी कशी उचल घेईल ? याचा काही नेम नाही. सहावीत शिकणारा जयेशचा आवाज त्याचे वर्ग शिक्षक राठोड यांनी ओळखला आणि त्याचे चंद्रा हे गाणे सोशल मीडियावर प्रसारित केले या बालकलाकारच्या आवाज तुफान प्रसारित होत थेट प्रख्यात संगितकार अजय – अतुलच्या दरबारात पोहचला आणि थेट अजय – अतुलने या बालकाराला थेट चिञपटात संधी देत रातोरात हिरो केले या यशाचे शिखर जयेशचे वाढत चालले असून त्याच्या आवाजाच्या भुरळीने अवघ्या दुमदुमत असतांना त्याला आता झी टिव्ही मराठी मधून दर बुधवारी आणि शनिवारी सारेगामापा ‘लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमात तो झळकणार आहे ग्रामिण भागात शिकत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्याचा आवाज त्याच्या शिक्षकाने ओळखून समाजमनात प्रसारित केल्यामुळे या बालकलाकाराच्या कलागुणाला वाव मिळाला असल्याने जयेशचे जिल्ह्यासह महाराष्ट्रात कौतुक होतांना दिसत आहे.