अकलूज – खंडाळी (ता. माळशिरस) येथे जय भवानी नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने श्रीपूर रोड येथील जय भवानी मंदिरासमोर ११११ दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन आज शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी सात वाजता करण्यात आले होते, या कार्यक्रमास शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावत भरघोस प्रतिसाद दिला. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष अमोल मेथा यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी सर्व सदस्यांनी परिश्रम घेत हजारो दिव्यांनी परिसर उजळून टाकला.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष अमोल मेथा, विक्रम मेथा, प्रितम मेथा, लखन काळे, भाऊसाहेब शिंदे, राजेंद्र गव्हाणे, अनिकेत खरात, महादेव ढेरे, उमाकांत कटके, नवनाथ काळे, विनोद थोरात, यशराज मेथा, परशुराम बोडरे, चंद्रकांत खंडागळे, अनिल काळे, अनिकेत मोरे, अभिजित मोरे, रामदास चव्हाण, संदेश थोरात, मोहसीन मुलाणी, कार्तिक कटके, गिरीश कटके, भीमा कटके, श्रेयस मैड, स्वरूप कटके, ओंकार कटके, अवधुत मैड, ओम ढाळे, हर्षवर्धन लोंढे, पूजा मैड, वैष्णवी म्हस्के, पल्लवी वाघमारे, सानिका चौगुले उपस्थित होते.